ऑफलाइन वर्ग सुरु होणार? जेएनयू, डीयू आणि जामिया विद्यापीठ घेणार बैठक

Offline Classes: देशभरातील करोनाची आकडेवारी कमी होताना दिसत असताना ऑफलाइन वर्ग सुरु करण्याबाबत विचार केला जात आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (), दिल्ली विद्यापीठ (DU) आणि जामिया मिलिया इस्लामिया (JMI) या विद्यापीठांनी वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अंतर्गत बैठका बोलावली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी १ सप्टेंबरपासून सर्व महाविद्यालये पुन्हा सुरू केली जाऊ शकतात असे विधान केले. त्यानंतर या विद्यापीठांनी बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली विद्यापीठाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार करोना केसेसमध्ये घट दिसू लागल्याने विज्ञान सायन्स शाखेसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. पण विद्यापीठ शिक्षकांच्या एका विभागाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर डीयूने आपला निर्णय पुढे ढकलला. ३१ ऑगस्टला आमची कार्यकारी परिषदेची बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही नियोजन करू आणि आणखी एक बैठक घेऊ असे दिल्ली विद्यापीठाचे रजिस्टार विकास गुप्ता यांनी सांगितले. आम्ही १ सप्टेंबरपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करू शकत नाही. जेव्हा कधी आम्ही पुन्हा वर्ग सुरू करू तेव्हा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवात होईल असेही ते म्हणाले. अधिकृत आदेश मिळाल्यानंतर विद्यापीठ प्रशासन अंतर्गत चर्चा करेल असे जेएनयूचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान जामिया मिलिया इस्लामियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संस्था ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाइडलाइन्सची वाट पाहील. सोबतच अंतर्गत चर्चा देखील केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Blzffy
via IFTTT

Post a Comment

0 Comments