Also visit www.atgnews.com
देशातील एका शिक्षकावर किती विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी? जाणून घ्या डिटेल्स
udise Report: देशातील एका शिक्षकावर किती विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी असते ? याची माहिती देण्यात यूडीआयएसई रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. विविध स्तरांवर विद्यार्थी आणि शिक्षकांचे गुणोत्तर या अहवालामध्ये देण्यात आले. या अहवालानुसार, देशात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. माजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ट्वीट करून विद्यार्थ्यांचे ताजे शिक्षक गुणोत्तर शेअर केले होते. UDISE+ २०१९-२० च्या अहवालानुसार, विविध स्तरांवर विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर पुढीलप्रमाणे आहे. प्राथमिकसाठी विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर २६.५ टक्के आहे. उच्च प्राथमिकसाठी विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर १८.५ टक्के आहे. माध्यमिकते विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर १८.५ टक्के आहे. तर उच्च माध्यमिकचे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर २६.१ टक्के आहे. UDISE+ २०१९-२० च्या अहवालानुसार, २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर एकूण नावनोंदणी प्रमाण सुधारले आहे. शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर (पीटीआर) देखील सुधारले आहे. अहवालानुसार २०१९-२० मध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंत मुलींची नोंदणी १२.०८ कोटींपेक्षा जास्त आहे. २०१८-१९ च्या तुलनेत १४.०८ लाख इतकी मोठी वाढ झाली आहे. या अहवालात म्हटल्यानुसार २०१२-१३ आणि २०१९-२० दरम्यान, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दोन्ही स्तरांवर लिंग समानता निर्देशांक (GPI) मध्ये सुधारणा झाली आहे. UDISE+ अहवालात मागील वर्षाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये वीज, संगणक, इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झाली आहे. हात धुण्याची सुविधा असलेल्या शाळांच्या संख्येत आणखी सुधारणा दिसून आली आहे. २०१९-२० मध्ये भारतातील ९० टक्के पेक्षा जास्त शाळांमध्ये हात धुण्याची सुविधा होती, तर २०१२-१३ मध्ये हा आकडा फक्त ३६.३ टक्के होता. केंद्रीय शिक्षणविभागाने याबद्दल माहिती दिली. अहवालानुसार, २०१२-१३ आणि २०१९-२० दरम्यान उच्च माध्यमिकमधील सकल नावनोंदणी प्रमाणात(GER) ११ टक्क्यांहून अधिक सुधारणा झाली आहे. उच्च माध्यमिकसाठी जीईआर २०१२-१३ मध्ये ४०.१ टक्क्यांच्या तुलनेत २०१९-२० मध्ये ५१.४ टक्क्यांपर्यंत वाढले. अहवालानुसार, २०१९-२० मध्ये ९६.८७ लाख शिक्षक शालेय शिक्षणात गुंतले होते. २०१८-१९ च्या तुलनेत हे सुमारे २.५७ लाख अधिक आहे. चालू संगणक असलेल्या शाळांची संख्या २०१९-२० मध्ये ५.२ लाख झाली. जी २०१८-१९ मध्ये ४.७ लाख होती. इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांची संख्या २०१८-१९ मध्ये २.९ लाखांवरून २०१९-२० मध्ये ३.३६ लाख झाली. २०१९-२० मध्ये ८३ टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये वीज होती. जी मागील वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत सुमारे ७ टक्के अधिक आहे. २०१३ मध्ये साधारण ५४.६ टक्के शाळांमध्ये वीज होती असे अहवालात म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VSaCYA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments