CBSE Board: सीबीएसईतर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन करिअर काऊन्सिलिंग पोर्टल सुरु

CBSE launches portal: सीबीएसईतर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम करण्यासाठी ऑनलाइन काऊन्सिलिंग पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड ()ने यूनिसेफसोबत मिळून याची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना या ऑनलाइन करिअर काऊन्सिलिंग पोर्टलच्या माध्यमातून करिअर, कॉलेजच्या माहितीसोबत विविध देशातील अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि स्पर्धात्मक परीक्षांसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. करिअर पोर्टल मोबाइल अॅप्लिकेशनच्या रुपात देखील उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाइट cbsecareerguidance.com वर जाऊन विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करता येऊ शकते. सीबीएसईतर्फे देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ऑनलाइन पोर्टल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून संधी पोहोचविण्यास मदत करणार आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी योग्यवेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. यासाठी यूनिसेफ, अनेक राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राने स्थानिक भाषेत करिअर पोर्टल सुरु केले आहे. हे पोर्टल सीबीएसईच्या मुख्य पोर्टलशी संबंधित आहे. प्रत्येक शाळेत दोन शिक्षकांना प्रशिक्षण देणार सीबीएसई शाळेचे विद्यार्थी पोर्टलवर साइन इन करु शकतात. पोर्टलमध्ये करिअर काऊन्सिलिंग किंवा टीचर डॅशबोर्ड असेल. प्रत्येक शाळेत दोन शिक्षकांना पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल प्रशिक्षण दिले जाणार आहे. संपूर्ण करिअर अभ्यासक्रम पोहोचविण्यासाठी डॅशबोर्डवर दिला गेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे आणि मार्गदर्शन मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jpznmT
via IFTTT

Post a Comment

0 Comments