Also visit www.atgnews.com
CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये विविध पदांची भरती
CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CRPF) विविध पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रिक्त जागा, पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. सीआरपीएफतर्फे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या इंजिनीअरिंग प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.सीआरपीएफची अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीद्वारे सीआरपीएफमध्ये कमांडंट आणि डेप्युटी कमांडंटच्या १३ पदांची भरती केली जाईल. यामध्ये कमांडंट पदाच्या दोन जागा आणि डेप्युटी कमांडंट पदाच्या ११ जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. त्यानंतर हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. कमांडट (इंजिनीअरिंग) लेव्हल १३ च्या दोन जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी १ लाख २३ हजार १०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० रुपये पगार देण्यात येईल. गुहावटी, जम्मू, हैदराबाद,कोलकाता या ठिकाणी यांची पोस्टिंग केली जाणार आहे. डेप्युटी कमांडंट (इंजिनीअरिंग) लेव्हल ११ च्या ११ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी ६७ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७०० रुपये पगार दिला जाणार आहे. देशभरात पद रिक्त असलेल्या राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. नोटिफिकेशन सोबत दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार उमेदवारांनी आपला अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज उपमहानिरीक्षक (Pers), महासंचालनालय, , सीजीओ कॉम्प्लेक्स, ब्लॉक नंबर 1, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठवायचा आहे. २३ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bn2n6i
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments