FYJC Online Merit List: अकरावी प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जाहीर झाली. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल तीन लाख २० हजार ७१० जागांसाठी दोन लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील अवघ्या दोन लाख दोन हजार ५८ विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीचे पर्याय भरलेले होते. तुम्हाला पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झाले आहे का ते पुढील पद्धतीने पाहता येईल - - सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://ift.tt/2WnqAHp वर जा. - आपला आयडी पासवर्ड देऊन लॉग इन करा. - लॉग इन केल्यावर स्क्रीनवर डिटेल्स येतात आपले - डॅश बोर्डवर चेक अलॉटेड कॉलेज पर्यायावर क्लिक करा. - कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं नाव येथे दिसेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gCqcPz
via IFTTT

Post a Comment

0 Comments