बारावीनंतर कमी फीचे शॉर्ट टर्म कोर्स करा; नोकरीच्या संधी अधिक

Guidance: बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा ? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. कोणता कोर्स केल्यावर मिळतील? कमी फीमध्ये कोणते कोर्स करता येतील? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जातात. आम्ही तुम्हाला काही कोर्स सांगणार आहोत जे कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देतील. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी आपले करिअर करु शकतात. बरेच विद्यार्थी कोर्स निवडताना घाई करतात त्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातून त्यांना याचा फायदा मिळत नाही. कमी वयात चांगले कोर्स निवडल्यावर लॉंग टर्मसाठी याचा फायदा होतो आणि विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होते. डिप्लोमा इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग (Diploma in Drawing and Painting) फाइन आर्टची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंगमधील डिप्लोमा एक चांगला पर्याय ठरु शकतो. विविध संस्थांमध्ये ६ महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत या क्षेत्रात डिप्लोमा करता येतात. कटिंग आणि टेलरिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Cutting and Tailoring) बारावीनंतर अनेक मुली कटिंग आणि टेलरिंग कोर्सेकडे वळतात हे दिसून येतं. अनेक स्वयंसेवी संस्था, सरकारी आयटीआय आणि खासगी संस्था या क्षेत्रात ६ महिने ते एक वर्षाचा डिप्लोमा देतात. डिप्लोमा इन ब्यूटी कल्चर अॅण्ड हेअर ड्रेसिंग (Diploma in Beauty Culture and Hair Dressing) सध्या बहुतांश मुलं-मुली स्वत:च्या ड्रेसिंग स्टाइल, हेअर स्टाइलकडे जास्त लक्ष देतात. डिप्लोमा इन ब्यूटी कल्चर आणि हेअर ड्रेसिंग कोर्स हे मुलामुंलींच्या करिअरसाठी खूप उपयुक्त आहे. आजकाल अनेक मेकओव्हर आर्टिस्ट हा कोर्स करतात. फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा (Diploma in Fashion Designing) तरुण पिढीमध्ये फॅशनबाबत नेहमीच क्रेझ असते. बाजारात कोणती नवी फॅशन आली आहे, कोणता ट्रेंड आहे याची माहिती तरुण वर्गाकडे असते. हा डिप्लोमा केल्यास तुमच्या फॅशन सेन्सला अभ्यासक्रमाची जोड मिळेल आणि करिअरच्या संधी खुल्या होतील. डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (Diploma in Hospitality Management) आपल्या देशातील संस्कृतीमध्ये पाहुणाचाराला प्राधान्य देण्यात येते. यासाठी विविध संस्था अभ्यासक्रम देतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट, क्लायंट रिलेशनशिप मॅनेजर अशा सर्व पदांसाठी अर्ज करता येतात. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा हा करिअरसाठी चांगला पर्याय आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38gXGy7
via IFTTT

Post a Comment

0 Comments