Also visit www.atgnews.com
GATE परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑगस्टपासून
GATE 2022: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (Graduate Aptitude Test in Engineering , ) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ३० ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल आणि २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे ते अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात. 2021 चं आयोजन यंदा आयआयटी खडगपूर करणार आहे. संस्थेने सर्व उमेदवारांना कोविड -१९ लस घेण्याचा सल्ला दिला आहे. आयआयटी खडगपूरने एका निवेदनात म्हटले आहे की जे उमेदवार या परीक्षेत सहभाग होणार आहेत, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत, सध्याच्या कोविड -१९ महामारी स्थितीमुळे परिस्थिती अनुकूल नसल्यास या वेबसाइटवर जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा देखील बदलू शकतात. क्वचित प्रसंगी, गेट 2022 ची परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते. या वर्षी परीक्षेसाठी दोन नवीन पेपर सादर करण्यात आले आहेत. जिओमॅटिक्स इंजिनिअरिंग (जीई) आणि नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीन इंजिनीअरिंग (एनएम) या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yocIgp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments