Also visit www.atgnews.com
HSC Result 2021: कुठे, कसा पाहाल बारावीचा निकाल?
Live Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल आज दुपारी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार हा निकाल लावण्यात आला आहे. दहावी निकालाच्या वेळेस राज्य शिक्षण मंडळाची वेबसाइट क्रॅश झाली होती. त्यामुळे रिझल्ट लागल्यानंतरही पुढचे चार ते पाच तास विद्यार्थ्यांना पाहता येत नव्हता. यातून बोर्डाने धडा घेतला असावा अशीच अपेक्षा बारावीचे विद्यार्थी आणि पालक करत आहेत. दरम्यान आज जाहीर होणारा निकाल कुठे आणि कसा पाहायचा याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाचा निकाल जाहीर होणार आहे. दरवर्षी या नऊ मंडळांमध्ये निकालाच्या दिवशी चुरस पाहायला मिळते. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात कोणता विभााग बाजी मारणार? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. कुठे पाहता येणार निकाल? पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे - याशिवाय आणि या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3frvLj3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments