Also visit www.atgnews.com
HSC Result 2021: शाखानिहाय असा आहे बारावीचा निकाल
Maharashtra : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एकूण ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान यंदा शाखानिहाय निकालाची टक्केवारी देखील चांगली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२० आणि २०२१ च्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची तुलनात्मक आकडेवारील पुढीलप्रमाणे आहे. विज्ञान शाखेचा निकाल गेल्यावर्षी २०२० साली विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल ९६.९३ टक्के होता तर यंदा बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कला शाखेचा निकाल गेल्यावर्षी २०२० साली बारावीच्या कला शाखेचा निकाल ८२.६३ टक्के इतका होता. तर यंदा हा निकाल ९९.८३ टक्के इतका आहे. यामध्ये यंदा १७.२० टक्क्यांहून अधिक वाढ झालेली दिसतेय. वाणिज्य शाखेचा निकाल वाणिज्य (कॉमर्स) शाखेचा गेल्यावर्षीचा निकाल ९१.२७ टक्के होता. यंदा २०२२ साली ९९.९१ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये ८.६४ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचा गेल्यावर्षीचा निकाल हा ९०.६६ टक्के इतका होता. यंदा २०२२ साली हा निकाल ९८.८० टक्के इतका लागला. यंदा या निकालामध्ये १२.७३ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. एकूण शाखानिहाय निकाल गेल्यावर्षी २०२० सालचा एकूण शाखानिहाय निकाल हा ९०.६६ टक्के इतका होता. तर यंदा हा निकाल ९९.६३ टक्के इतका आहे. एकूण निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत ८.९७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कोविड-१९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. पुढील लिंकवर पाहता येणार निकाल -
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A6Dtak
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments