Also visit www.atgnews.com
IGNOU ने जुलै सत्रातील प्रवेश आणि पुनरनोंदणीची तारीख वाढवली, जाणून घ्या अपडेट
July Admission 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (The Indira Gandhi National Open University) ने जुलै सत्रासाठी नवे प्रवेश ( 2021) आणि पुनरनोंदणी करण्याची तारीख वाढवली आहे. आता इच्छुक आणणि पात्र उमेदवार १६ ऑगस्टपर्यंत नोंदणी करु शकतात. नव्या उमेदवारांना नवीन नोंदणी करावी लागेल आणि सर्व माहिती भरावी लागले. आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडावा लागेल. उमेदवारांनी अर्ज फॉर्म (IGNOU Application Form) जमा करताना दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचावे असा सल्ला देण्यात आला आहे. विद्यापीठात विविध विषयांमध्ये २०० हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांमध्ये मास्टर डिग्री, पदवी, पीजी डिप्लोमा आणि डिप्लोमा, पीजी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट कार्यक्रम, अॅप्रिसिएशन/अवेअरनेस कार्यक्रमांचा समावेश असतो. या सर्व कार्यक्रमांची माहिती अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जाऊन पाहू शकता. IGNOU Admission 2021 असा करा अर्ज यासाठी अर्ज करताना सर्वात आधी इग्नूची वेबसाइटवर ignou.ac.in जा वेबसाइटच्या होमपेजवर दिल्या गेलेल्या Admission लिंकवर क्लिक करा आता लॉगिन करुन अर्ज फॉर्म भरा आणि पूर्ण निर्देश काळजीपूर्वक वाचा फीस भरा आणि फॉर्म सबमिट करा भविष्यातील उपयोगासाठी फॉर्मची प्रिंटआऊट काढा इग्नूतर्फे जून टर्म अॅण्ड एक्झाम उद्यापासून (IGNOU June TEE 2021) इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ (IGNOU) ने जून टर्म अॅण्ड एक्झाम २०२१ (TEE 2021) चे आयोजन ३ ऑगस्ट २०२१ पासून केले जाणार आहे. प्रत्येक दिवसाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षा देणाऱ्यांसाठी हॉलतिकिट आधीच जाहीर करण्यात आले आहे. तसेच इग्नूने परीक्षार्थींसाठी महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A0ejdh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments