Also visit www.atgnews.com
HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तयार करण्यात आला आहे. कुठे पाहता येणार निकाल? पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे - याशिवाय व या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या परिपत्रकानुसार, 'सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iipZlR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments