IIFT Entrance Exam 2021: एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) च्या प्रवेश परीक्षेचे अर्ज सप्टेंबरपासून

द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरन ट्रेड (Indian Institute of Foreign Trade, IIFT)एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) च्या प्रवेशांसाठी संगणकीकृत प्रवेश चाचणी घेणार आहे. २०२२-२४ या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी रविवार, ५ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाी अर्ज करायचा आहे, ते .ac.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. NTA ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात/सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात अधिकृत अधिसूचना जारी करेल आणि परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चालेल. CBT साठी नोंदणी शुल्क SC/ST/transgender/PWD उमेदवारांसाठी १००० रुपये आणि इतर श्रेणींसाठी २५०० रुपये आहे. शुल्क डेबिट/ क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, पेटीएम आणि यूपीआय सेवांद्वारे भरता येते . परदेशी नागरिक/ अनिवासी भारतीय १-१५ जानेवारी पासून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या GMAT स्कोअर आणि IIFT कॅम्पसमध्ये वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल. देशातील ६८ वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीनुसार चार शहरे निवडण्याचा पर्याय दिला जाईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ५ डिसेंबर २०२१ पर्यंत डाऊनलोड केली जाऊ शकतात. संगणक-आधारित प्रवेश परीक्षा दोन तासांच्या कालावधीची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकार लेखी परीक्षा (इंग्रजीमध्ये) असेल आणि त्यात परिमाणात्मक विश्लेषण, वाचन आकलन आणि मौखिक क्षमता, डेटा इंटरप्रीटेशन, लॉजिकल रिजनिंग आणि सामान्य ज्ञान याचा समावेश असेल. CBT परीक्षेचा निकाल डिसेंबर २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ytXI0q
via IFTTT

Post a Comment

0 Comments