Also visit www.atgnews.com
NCHMCT JEE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर
JEE 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () परीक्षेची उत्तरतालिका आपली अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाहीर केली आहे. २९ ऑगस्ट रोजी एनटीएने ही आन्सर की उपलब्ध केली. विद्यार्थ्यांना या उत्तरतालिकेसोबत प्रश्नपत्रिका आणि त्यांनी दिलेली उत्तरेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी जर एखाद्या उत्तरावर असमाधानी असतील तर त्यांना त्यासाठी हरकत नोंदवता येईल. नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या हॉटेल मॅनेटमेंट कोर्सेसच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते NCHMCT JEE 2021 चा अंतिम निकाल अंतिम आन्सर कीच्या आधारे निश्चित केला जाईल. उमेदवार nchmjee.nta.nic.in वरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतील. स्कोअरकार्डमध्ये, उमेदवाराने मिळवलेले कच्चे गुण आणि अखिल भारतीय गुणवत्ता नमूद केली जाईल. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेचे वाटप केले जाईल. हा निकाल केवळ या शैक्षणिक वर्षासाठी वैध राहील. पुढील पद्धतीने विद्यार्थ्यांना NCHMT JEE 2021 ची आन्सर की डाऊनलोड करता येईल - १: अधिकृत वेबसाइट- nchmjee.nta.nic.in वर जा २:‘Display question paper and answer key challenge NCHM JEE 2021’ लिंकवर क्लिक करा ३: दोन लॉगिन पर्याय दिसतील,त्यापैकी एक योग्य पर्याय निवडा ४: आवश्यक माहिती भरा. त्यानंतर स्क्रीनवर उत्तरतालिका दिसेल NTA त्यानंतर NCHM JEE स्कोअर 2021 NCHMCT कडे सोपवेल. त्यानंतर, एनसीएचएमसीटी बीएससी (एचएचए) अभ्यासक्रमांमध्ये पात्र उमेदवारांच्या प्रवेशासाठी समुपदेशन करण्यात येईल. ज्या उमेदवारांना उत्तर तालिका किंवा NCHMCT JEE 2021 ला हरकत घ्यायची आहे, ते लॉगिनमधून हरकत नोंदवू शकतात. असे करताना उमेदवारांना रु. १००० प्रति आव्हान शुल्क भरावे लागील. आक्षेप / आव्हान वैध आढळल्यास हे शुल्क परत केले जाईल. वैध आक्षेपांचा विचार केला जाईल आणि त्यावर अंतिम उत्तर तालिका तयार केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sZl9xB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments