MKCL मध्ये ४० पदांची भरती, पात्रता-निकष जाणून घ्या

MKCL : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या प्रशासकीय विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)योजने अंतर्गत एकूण ४० जागा भरल्या जातील. या पदासाठी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. MKCL मध्ये प्रोजेक्ट असोसिएट पदाची भरती करण्यासाठी पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार भारताच्या सर्व भागातून प्रतिभावान, उत्साही, सक्रिय आणि नुकतेच एमबीए केलेल्या उमेदवारांना यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. एमकेसीएलद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे गुणवत्तेच्या आधारे सर्वोत्तम उमेदवाराची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या उमेदवाराला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, डेव्हलपमेंट इनपुट आणि थेट प्रकल्पांवर शिकण्याचा अनुभव देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना बौद्धिक, भावनिक आणि नैतिकदृष्ट्या समृद्ध करुन आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. पात्रता मॅनेजमेंट ट्रेनीसाठी ओपनिंगसाठी पात्रता निकष देण्यात आले आहेत. त्यानुसार २०१९ किंवा २०२० मध्ये MBA उत्तीर्ण झालेले उमेदवार (२०२१ मध्ये MBA शिकणाऱ्या किंवा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये) अर्ज करु शकतात. कॉम्प्युट इंजिनीअरिंग/आयटी/ E&TC मध्ये पदवी असणे गरजेचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या उमेदवारास सुरुवातीला एमकेसीएल पुणे / नवी मुंबई / पाटणा / पंचकुला / भुवनेश्वर येथे थेट प्रकल्पांमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण असाइनमेंट आणि इंटर्नशिपसाठी घेण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारांना इतर सुविधांसह पगार दिला जाणार आहे. पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाइटवरील मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ सप्टेंबर २०२१ पर्यत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UeUQ9u
via IFTTT

Post a Comment

0 Comments