Also visit www.atgnews.com
MU UG Admission 2021: तिसऱ्या यादीत कला शाखेचे वर्चस्व
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी यादी (Degree Admission ) सोमवारी संध्याकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आली. या यादीत कला शाखेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बहुतांश नामांकित कॉलेजांचा कला शाखेचा कट ऑफ नव्वदीपार आहे. तर इतर अभ्यासक्रमांचा कट ऑफही काही पूर्णांकांनीच घटल्याचे समोर आले आहे. झेविअर्स कॉलेजमध्ये तर प्रथम वर्ष बीएसाठी अतिरिक्त तुकडी सुरू करण्यात आली आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन ते चार टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवूनही नामांकित कॉलेजांत प्रवेश मिळू शकलेला नाही. कला शाखेखालोखाल वाणिज्य शाखा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यंदा प्रथमच तिसऱ्या यादीत विज्ञान शाखेचा कट ऑफ सुमारे दहा ते बारा टक्क्यांनी वाढलेला दिसत आहे. गतवर्षी ७५ ते ८० टक्क्यांवर बंद झालेल्या विज्ञान शाखेच्या तिसऱ्या यादीचा कट ऑफ यंदा ८५ ते ९०च्या दरम्यान असल्याचे पाहावयास मिळाले. इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी नियमित विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊन ठेवले आहेत. यामुळे इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीयचे प्रवेश झाल्यानंतर विज्ञान शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकणार आहे. मात्र त्यासाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया होणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यंदा बारावीचा निकाल वाढल्यामुळे गरज भासल्यास कॉलेजांना अतिरिक्त तुकडी देण्याबाबतही सूचना करण्यात आली होती. यानुसार काही कॉलेजांना अतिरिक्त तुकडीही वाढवून देण्यात आल्याचे या यादीतून समोर आले आहे. झेविअर्स कॉलेजने बीएएमसीजे या अभ्यासक्रमासाठी नवीन तुकडी सुरू केली आहे. मात्र या तुकडीचा कट ऑफही नव्वदीपार असल्याने अनेकांचे झेविअर्स कॉलेजमध्ये प्रवेशाचे स्वप्न भंगले आहे. झेविअर्स कॉलेज बीएसस्सी आयटी - ७७.४४ बीएएमसीजे (नवी तुकडी) - ९१.७२ .... रुईया कॉलेज बीए (इंग्रजी) - ९४.८३ बीए (सीअँडएम) इंग्रजी - ९४.८३ बीएस्सी - ८३.३ बायोटेक्नॉलॉजी - ९५.५ .. पाटकर कॉलेज बॅफ - ७९.८३ बीएससी आयटी - ७३.५ बीएससी कम्प्युटर सायन्स : ७०.६६ बीएमएस - ७९.५०
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3juZZUG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments