Also visit www.atgnews.com
दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून NEP लागू, ४ वर्षांच्या UG अभ्यासक्रमाला होणार सुरुवात
on : वर्ष २०२० मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आणलेल्या नवीन (NEP) अंतर्गत, शालेय शिक्षणासह उच्च शिक्षणाबाबतच्या सूचना लागू करण्याची प्रक्रिया विविध शैक्षणिक संस्थांकडून सुरु झाली आहे. या पार्श्वभुमीवर दिल्ली विद्यापीठाने NEP 2020 लागू करण्यास मान्यता दिली आहे. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या बैठकीत, डीयूच्या कार्यकारी परिषदेने (EC) शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून NEP च्या अंमलबजावणीला मान्यता दिली. या मान्यतेसह दिल्ली विद्यापीठाच्या प्रस्तावानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम २०२२ पासून सुरु होणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी निवडलेल्या २६ पैकी १६ सदस्यांच्या निर्णयाविरुद्ध असहमती व्यक्त करून अजेंडा मंजूर केला होता. कोणतीही चर्चा न करता फक्त असहमती नोंदवण्यास सांगण्यात आले असा आरोप सदस्यानी केला होता. दिल्ली विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ परिषदेच्या मान्यतेबद्दल कुलसचिव विकास गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले. 'नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२२-२३ च्या सत्रापासून लागू केले जाईल. एनईपी आणि चार वर्षांच्या पदवीधर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला गेल्या आठवड्यात स्थायी समिती आणि शैक्षणिक परिषदेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या सूचनांनुसार पुढील सत्रापासून सुरू होणाऱ्या चार वर्षीय यूजी कार्यक्रमात मल्टीपल एन्ट्री/ एक्झिट स्कीम (MEES) जिथे विद्यार्थी वेगवेगळ्या टप्प्यांत आणि कोर्समध्ये प्रवेश करू आणि बाहेर पडू शकतील. गेल्या आठवड्यात आयोजित अकादमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) मध्ये हे देखील मंजूर करण्यात आले. विद्यापीठाची सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेने एमईईएस आणि एबीसीला मान्यता दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38v7VyY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments