Also visit www.atgnews.com
NCHM JEE Admit Card 2021: हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेसाठी हॉलतिकिट जाहीर
Admit Card 2021: एनसीएचएम जेईई प्रवेश पत्र २०२१ ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ने एनसीएचएम जेईई २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एनटीएने ३० जुलै २०२१ ला जाहीर केलेल्या सुचनेनुसार परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा पोर्टल nchmjee.nta.nic.in वर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते. दुसरीकडे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ने हॉटेल मॅनेजमेंट परीक्षा एनसीएचएम जेईई २०२१ चे आयोजन १० ऑगस्ट २०२१ ला करण्यात आले आहे. ही परीक्षा रिमोर्ट प्रॉक्टर्ड ऑनलाइन (इंटरनेट बेस्ड) माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली. या प्रवेश परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज नाही. ते आपल्या घरुन स्वत:च्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा देऊ शकतात. दरम्यान उमेदवारांकडे स्थिर इंटनेट कनेक्टिविटी असणे गरजेचे आहे. उमेदवारांना एनसीएचएम जेईई २०२१ प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी काही महत्वाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक कॉम्प्युटर हार्डवेअर / सॉफ्टवेअर संबंधित गरज, परीक्षेचा गाईडलाइन्स, काय करावे आणि काय नाही? मॉक टेस्ट संबंधित माहिती एनटीएतर्फे उमेदवारांच्या रजिस्टर ईमेल आयडीवर पाठवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना आपला नोंदणीकृत ईमेल आयडी नियमित तपासणे गरजेचे आहे. या स्टेप्स फॉलो करुन प्रवेश पत्र मिळवा उमेदवारांनी आपले एनसीएचएम जेईई २०२१ प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षा पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. नव्या पेजवर आपला रोल नंबर, जन्म तारीख आणि स्क्रिनवर दिले गेलेले सिक्योरीटी पिन भरुन सबमिट करावे लागेल. यानंतर उमेदवार आपले एनसीएचएम जेईई प्रवेश पत्र २०२१ डाऊनलोड करु शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AmKLab
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments