Also visit www.atgnews.com
UGC NET notification: यूजीसी नेटचे महत्वाचे नोटिफिकेशन, करोना काळात 'या' विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
notification: विद्यापीठ अनुदान आयोग University Grant Commission) ने नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (UGC NET) शी संबंधित महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जेआरएफ (JRF) परीक्षा पास केली पण करोनामुळे त्यांना मास्टर्स डिग्री पूर्ण करता आली नाही अशा विद्यार्थ्याांसाठी यूजीसीने या नोटिफिकेशनमध्ये दिलासा दिला आहे. यूजीसीने नोटीस जाहीर करुन त्या उमेदवारांना आनंदाची बातमी दिली, ज्यांनी आधीच १८ डिसेंबर किंवा १९ जून मध्ये परीक्षा पास झाले आहेत किंवा जे उमेदवार आधीच यूजीसीच्या नियमाप्रमाणे जेआरएफसाठी क्वालिफाइड झाले आहेत पण करोनामुळे ज्यांना मास्टर्स प्रोग्राम पूर्ण करता आला नाही. ज्या उमेदवारांनी डिसेंबर २०१८ मध्ये यूजीसी नेट (UGC NET) अॅण्ड जॉइंट सीएसआयआर यूजीसी (Joint CSIR UGC NET) टेस्ट क्वालिफाइड केली आहे त्यांना ३० जून २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. जे उमेदवार जून २०१९ मध्ये यूजीसी अॅण्ड नेट अॅण्ड सीएसआयआर यूजीसी टेस्ट पास झाले आहेत त्यांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अतिरिक्त वेळ मिळाला आहे. जे उमेदवार मास्टर डिग्री कोर्सचा अभ्यास पूर्ण करत आहेत ते देखील यूजीसी नेट एक्झाम (UGC NET 2021 Exam) साठी बसू शकतात. ज्या उमेदवारांनी आधीच मास्टर्स एक्झाम दिली आहे आणि आपल्या निकालाची वाट पाहत आहेत, ते देखील नेट एग्झाम देऊ शकतात. UGC NET 2020 डिसेंबरमध्ये करोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. त्यानंतर २ मे २०२१ ते १७ मे २०२१ दरम्यान निर्धारित करण्यात आली. आतापर्यंत UGC NET 2021 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले गेले नाही. दरम्यान, यूजीसी नेट २०२१ चे नोटिफिकेशन लवकरच अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rLgoae
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments