Also visit www.atgnews.com
UPSC IES ISS Exam 2020 परीक्षेचे गुण जाहीर; 'असे' तपासा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस IES आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ISS परीक्षा २०२० चे गुण जाहीर केले आहेत. IES ISS Exam 2020 परीक्षा १६ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आपले गुण केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ येथे जाऊन तपासू शकतात. UPSC IES ISS Exam 2020 परीक्षा ISS ची ५० पदे आणि IES च्या १५ पदांवरील भरतीसाठी घेण्यात आली आहे. UPSC IES ISS Exam 2020 परीक्षा १६ ते १८ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. लेखी परीक्षेनंतर व्यक्तिमत्त्व चाचणीदेखील झाली होती. निकालात अंतिम गुणांसाठी लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी दोहोंचे वेटेज ग्राह्य धरण्यात आले आहे. UPSC IES ISS Exam 2020 परीक्षेचे गुण कसे तपासावे? - केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in येथे जा. - 'Marks of Recommended candidates for ISS, Marks of Recommended candidates for IES 2020' पर्यायावर क्लिक करा. - आता ISS Exam 2020 ची एक पीडीएफ फाइल उघडेल. - अशाच प्रकारे IES Exam 2020 ची एक पीडीएफ फाइल उघडेल. - पीडीएफ डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा. उमेदवार त्यांचे नाव आणि रोल नंबरनिहाय गुण पाहू शकतात. UPSC IES 2020 परीक्षेत १००० पैकी ५२९ हे सर्वोत्तम गुण आहेत. UPSC ISS 2020 परीक्षेत २०० पैकी १४० गुण सर्वाधिक आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jPZ1BA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments