Also visit www.atgnews.com
WII recruitment 2021: भारतीय वन्यजीव संस्थेत विविध पदांची भरती, २० ऑगस्टपर्यंत करा अर्ज
WII : (WII) मध्ये सिनिअर बायोलॉजिस्ट, रिसर्च बायोलॉजिस्ट, ऑफिस असिस्टंट, प्रोजेक्ट फेला आणि डेटाबेस मॅनेजर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय वन्यजीव संस्था WILL च्या अधिकृत वेबसाइट wii.gov.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात. उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. उमेदवारांची निवड भरतीद्वारे केली जाणार आहे. असा असेल परीक्षा पॅटर्न सर्व उमेदवारांना २९ ऑगस्ट सकाळी १०.३० वाजता अधिकृत ईमेल आयडीवर एक मेल पाठविण्यात येईल ईमेलमध्ये ६ निबंध विषयांची यादी असेल. उमेदवाराला यातील एक विषय निवडावा लागेल. त्यावर किमान ३०० शब्द लिहावे लागतील. हा निबंध लिहून ११.३५ पर्यंत पाठवावा लागेल. त्यानंतर आलेल्या ईमेलचा विचार केला जाणार नाही. WII recruitment 2021: असा करा अर्ज स्टेप १ - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट wii.gov.in वर जा स्टेप २ - recruitment section वर क्लिक करा स्टेप ३- 'Contractual Engagement of 74 Project Personnel for various Projects' लिंकवर क्लिक करा. (बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.) स्टेप ४ - मागितलेली माहिती भरा स्टेप ५ - तुमचा फोटोग्राफ अपलोड आणि सबमिट करा स्टेप ६ - फॉर्म डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A4wb6I
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments