नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

Admit Card 2021: बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी (Assistant Manager)अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) ने ग्रेड ए आणि बी भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- nabard.org वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. नाबार्डमध्ये असिस्टं मॅनेजर पदाच्या १५७ रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया १७ जुलै २०२१ रोजी सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ७ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. तेच शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही तीच होती. आता त्याचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. परीक्षेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले आहे. NABARD 2021: प्रवेशपत्र असे करा डाउनलोड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- nabard.org ला भेट द्या. वेबसाइटवरील करिअर सेक्शनवर जा. आता असिस्टंट मॅनेजर ग्रेड 'ए' - (आरडीबीएस/राजभाषा) आणि व्यवस्थापक ग्रेड 'बी' - (आरडीबीएस) - २०२१ प्राथमिक परीक्षेसाठी कॉल लेटर या लिंकवर क्लिक करा. नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख इ.तपशील भरुन लॉगिन करा. लॉगिन केल्यावर स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. रिक्त पदाचा तपशील या रिक्त जागेत (नाबार्ड सहाय्यक व्यवस्थापक भरती २०२१) अंतर्गत एकूण १६२ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर जनरलसाठी १४८ जागा, राजभाषा सेवेसाठी ५ जागा, प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेसाठी २ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय ७ पदांवर महाव्यवस्थापकांची भरती होणार आहे. रिक्त जागांचा संपूर्ण तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. पदांनुसार पात्रता प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा- यामध्ये उमेदवारांना आर्मी नेव्ही एअर फोर्समध्ये ५ वर्षांच्या कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. महाव्यवस्थापक- महाव्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात ६० टक्के गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. मास्टर्समध्ये ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजर जनरल- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रात पदवी असणे आवश्यक आहे. पदवीधर उमेदवाराकडे किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. राजभाषा सेवा- अर्जदार पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच पदवीमध्ये ५० टक्के गुणांसह इंग्रजी आणि हिंदी विषय असणे अनिवार्य आहे. निवडीचे तीन टप्पे आहेत. त्याची माहिती पुढीलप्रमाणे... (अ) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन- सर्व पदांसाठी टेस्ट ऑफ रिझनिंग-२० प्रश्न, इंग्रजी भाषा-३० प्रश्न, कम्प्युटर नॉलेज-२० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड-२० प्रश्न, डिसिजन मेकिंग-१० प्रश्न, जनरल अवेअरनेस-२० प्रश्न, इकॉनॉमिकल अँड सोशिऑलॉजीकल इश्युज-४० प्रश्न, अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट-४० प्रश्न, एकूण-२०० प्रश्न, २०० गुण, वेळ-१२० मिनिटं जनरल अवेअरनेस, इको अँड सोशल इश्यूज व अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट या तीन विषयांवरील (१०० गुण) गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. (इतर विषय फक्त पात्रता स्वरूपाचे असतील.) (ब) पदनिहाय ऑनलाइन मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह (३० प्रश्न, ५० गुण) आणि डिस्क्रीप्टिव्ह (१५० गुण) स्वरूपाची असेल. (क) मुलाखत- ५० गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील एकत्रित गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग-अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांसाठी बँक विनामूल्य प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग आयोजित करणार आहे. त्याकरिता उमेदवारांनी Chief General Manager, NABARD यांना निवडलेल्या केंद्राच्या पत्त्यावर पाठवणे गरजेचे होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WHfIaJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments