Also visit www.atgnews.com
नीट २०२१ फेज २ रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच
नॅशनल टेस्टिंग एजन्सी ()लवकरच फेज 2 रजिस्ट्रेशन प्रक्रिया ( 2021) सुरू करणार आहे. एनटीएची परीक्षेकरिता असणारी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. नीटच्या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीच्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. NEET UG 2021 चे आयोजन १२ सप्टेंबर रोजी पेन आणि पेपर-आधारित मोड वर म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने करण्यात आलं होतं. उमेदवारांनी आपली माहिती योग्य प्रकारे सबमिट केली आहे, हे निश्चित करण्यासाठी एनटीएने नीट 2021 नोंदणी प्रक्रियेला दोन टप्प्यांत विभाजित केले आहे. नीट २०२१ अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांना मेडिकल परीक्षेसाठी नोंदणी करताना आवश्यक फील्डमध्ये तपशील भरून सबमीट करायचा होता. दुसरीकडे NEET च्या अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना निकाल जाहीर होण्याअगोदरच चॉइस भरायचे आहेत. नीट 2021 (NEET 2021) परीक्षेच्या माध्यमातून ८३,०७५ एमबीबीएस, २६,९४९ बीडीएस, ५२,७२० आयुष, ५२५ बीवीएससी आणि एएच, १,८९९ एम्स आणि २४९ जिपमर जागांवरील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) २०२१ च्या गुणांना आता B.Sc (H) नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y207mN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments