Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई विद्यापीठाने २०२१ च्या हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा () जाहीर केल्या आहेत. पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ५ च्या परीक्षा १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने ऑनलाइन होणार आहेत. सत्र ५ च्या काही परीक्षांचे वेळापत्रक आणि क्वेश्चन बँक विद्यापीठ पाठविणार बीए (एमएमसी ), बीएमएस, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट ) , बीकॉम (बॅंकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट ), बीकॉम ( फायनान्स अँड मार्केटिंग ), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( कॉम्प्युटर सायन्स ), बीएस्सी ( बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीएस्सी ( आयटी), बीएस्सी ( हॉस्पिटॅलिटी स्टडीज ), बीएस्सी ( एव्हीएशन) व बीएस्सी ( एरोनॉटिक्स) या पदवीच्या ५ व्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तसेच या परीक्षेसाठी प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. कला , वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र १ व ३, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र पदवी परीक्षा सत्र ७, बीएड परीक्षा सत्र ३, विधी पदवी परीक्षा सत्र ५ व ९ या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्र जाहीर करण्यात येईल व याची प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. तसेच पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ६ च्या बॅकलॉगच्या परीक्षा ७ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. तर पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र २ व ४ च्या बॅकलॉगच्या परीक्षा १ ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. दरम्यान, आपल्या विद्यार्थ्यांची माहिती (मोबाइल नंबर, PNR क्रमांक, ईमेल, लॅपटॉप/डेस्कटॉप/स्मार्ट फोन, इंटरनेट आणि विद्यार्थी सद्यपरिस्थितीत कुठे आहे इ.) गोळा करण्याचे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि तोंडी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात याव्या, असे सांगण्यात आले आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी कॉलेज क्लस्टर तयार केले आहे. प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड म्हणून परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडायची आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ukf3s3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments