देशाच्या संरक्षण विभागात बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Defence Sector : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाने त्याच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत चार्जमन, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कनिष्ठ आहारतज्ञ, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ मसुदाकार आणि वैज्ञानिक सहाय्यक या पदांचा समावेश आहे. पदभरतीचा तपशील वरील पदांव्यतिरिक्त, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नौदलाने देखील भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांमध्ये TOPASS, स्टोअर कीपर, फ्लोटिंग क्रेन पायथनसाठी क्रेन ऑपरेटर आणि मॅमथ, फायरमॅन, Lascar-I आणि अधीक्षक (स्टोअर) यांचा समावेश आहे. या पदांसाठी भरती एअरोनॉटिकल क्वालिटी एश्योरन्स, संरक्षण उत्पादन, वैद्यकीय सेवा (Army) आणि डायरेक्टोरेट जनरल ऑफ NCC अंतर्गत भरती केली जात आहे. संरक्षण मंत्रालयाने भरती प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी कर्मचारी निवड आयोगाकडे (एसएससी) सोपवली आहे. त्याच वेळी, भरती प्रक्रियेअंतर्गत, एसएससीने एकूण ८२७ रिक्त जागांसाठी अर्ज मागिवले आहेत. ज्यामध्ये चार्जमनच्या १८, गर्ल्स कॅडेट इंस्ट्रक्टरच्या २६७, ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या ३, कनिष्ठ आहारतज्ज्ञांच्या १, ज्युनिअर इंजिनीअरच्या १६५,सिनिअर ड्राफ्टमनच्या ६ आणि वैज्ञानिक सहाय्यकाच्या ९ जागा रिक्त आहेत. प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. कुठे कराल अर्ज? इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत वेबसाईटवर https://ssc.nic.in वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख: २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर अर्जाची अंतिम तारीख: २५ ऑक्टोबर रात्री ११.३० पर्यंत ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर रात्री ११.३० पर्यंत ऑफलाइन चालान तयार करण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर रात्री ११.३० पर्यंत चालानद्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख: १ नोव्हेंबर कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या तारखा: जानेवारी/फेब्रुवारी २०२२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ikUo2x
via IFTTT

Post a Comment

0 Comments