Also visit www.atgnews.com
फी माफीसाठी विद्यार्थ्याचा आक्रोश; प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर डोके आपटले
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्क (फी) माफ करावे, अशी मागणी करून विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर डोके आपटले. यात दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्यासह महाविद्यालयातील एक कर्मचारी जखमी झाला. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी गाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात बुधवारी ( २९ सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली. शुभम बारोट असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यासह महाविद्यालयाचे कर्मचारी सुरेश देसाई हेदेखील जखमी झाले. शुभम बारोट हा त्याचा वर्गमित्र ओंकार जाधव याच्यासह प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या कक्षामध्ये आला. फी माफीविषयी त्याचा प्राचार्यांशी वाद झाला. दरम्यान, शुभम बारोट याने प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर स्वत:चे डोके आपटून दरवाजाची काच फोडली. यात बारोट याच्यासह कर्मचारी सुरेश देसाई जखमी झाले. त्यानंतर बारोट याने काचेचा तुकडा घेतला आणि बाहेर गेला. काही गैरप्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी बारोट याला धरून आणले; तसेच पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्याला थांबविले. यात विद्यार्थी बारोट याला महाविद्यालयाचे शिक्षक किंवा कर्मचारी यांनी कोणीही मारहाण केलेली नाही, असे महाविद्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. व्हिडिओ फुटेज व्हायरल... महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराबाबतचा एक व्हिडिओ व्हावयरल होत आहे. यात काही जणांची गर्दी दिसत असून, एकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज येत आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे. त्यात प्राचार्य, शिक्षक; तसेच इतर काही जण आहेत. एक विद्यार्थी त्यांच्याशी बोलताना अचानक दरवाजावर डोके आपटत आहे. त्यामुळे दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे. महाविद्यालयात फीवरून वाद झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार केले. या प्रकरणी तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. - शंकर आवताडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3omNP2X
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments