Also visit www.atgnews.com
GATE 2022: गेट परीक्षेच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ
GATE Registration 2022: गेट 2022 परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) 2022 म्हणजेच गेट 2022 परीक्षा आयोजित करणारी संस्था आयआयटी खरगपूरद्वारे रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. उमेदवार आता गेट परीक्षेसाठी गुरुवार ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत विना विलंब शुल्क नोंदणी करू शकतात. यापूर्वी गेट परीक्षेसाठी विना विलंबशुल्क अर्ज करण्याची मुदत एकदा वाढवण्यात आली होती. म्हणजेच, २४ सप्टेंबर २०२१ रोजी संपणारी मुदत वाढवून २८ सप्टेंबर करण्यात आली होती. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आहे. अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत १ नोव्हेंबर पर्यंत दूसरीकडे, आयआयटी खरगपूर ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सूचना जारी करणार आहे. गेट 2022 अर्जातील दुरुस्तीसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत खुली राहील. यानंतर उमेदवार आपल्या अर्जात पेपर किंवा कॅटेगरीत किंवा परीक्षा केंद्रात १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत दुरुस्ती करू शकतील. मात्र या दुरुस्तीसाठी उमेदवारांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. अशी करा नोंदणी नोंदणी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जावे. यानंतर, होमपेजवर ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करा. नंतर दिलेल्या सूचना वाचून नवीन युजर/ रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. यानंतर मागितलेला तपशील भरून नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करा. यानंतर स्वत:च्या ईमेल आयडी आणि पासवर्डने लॉग इन करून आणि परीक्षेशी संबंधित तपशील भरून नोंदणी पूर्ण करा. GATE २०२२ फॉर्म भरताना, उमेदवारांना IIT खरगपूर द्वारे १५०० रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m7EPw6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments