उल्हासनगर महानगरपालिकेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

2021: उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत एकूण २७४ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, पगार, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय विभागात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वर्ड बॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी आणि हॉस्पिटल मॅनेजर पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाअंतर्गत अॅनेस्थेशिस्टच्या पाच जागा, फिजिशियनच्या ५ जागा, पेडीयाट्रीशनच्या ३ जागा रिक्त आहे. असून यासाठी संबंधित विषयातील पदवी असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारास २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या पदासाठी ४ ऑक्टोबर रोजी थेट मुलाखत होणार आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS उमेदवारांसाठी ४१ जागा रिक्त असून १ लाख रुपये पगार आहे. वैद्यकीय अधिकारी GDMO अंतर्गत AYUSH उमेदवारांच्या ५२ जागा रिक्त असून त्यासाठी ७५ हजार रुपये पगार दिला जाईल. यासाठी थेट मुलाखत ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्टाफ नर्स GNM उमेदवारांसाठी ५४ जागांवर भरती असून यासाठी ४५ हजार रुपये पगार दिला जाईल. तर ANM च्या २२ जागा भरणार असून यासाठी ३५ हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी ६ ऑक्टोबरला थेट मुलाखत होणार आहे. वॉर्ड बॉय पदाच्या ७८ जागा रिक्त असून यासाठी किमान दहावी आणि करोना प्रतिबंध कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी २० हजार रुपये पगार दिला जाईल. यासाठी ७ ऑक्टोबर रोजी मुलाखत होणार आहे. औषधनिर्माता पदाच्या ६ जागा रिक्त असून यासाठी फार्मसीमधील डिग्री आणि डिप्लोमा असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवारांना ३० हजार रुपये पगार मिळेल. प्रयोगशाळा वैज्ञानिक पदाच्या ६ जागा रिक्त असून संबंधित विभागातील पदवी किंवा पदवीका असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराला ३० हजारपर्यंत पगार देण्यात येईल. हॉस्पीटल मॅनेजरच्या २ जागा रिक्त असून यासाठी मेडिकल पदवी किंवा डिप्लोमा, एमएसडब्ल्यू, एमएससीआयटी असणे गरजेचे आहे. यासाठी ५० हजार रुपये पगार देण्यात येईल. ८ ऑक्टोबर रोजी मुलाखत होणार आहे. उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांनी आयुक्त, , उल्हासनगर-३ या पत्त्यावर दिलेल्या तारखांना थेट मुलाखतीसाठी यायचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uogdTx
via IFTTT

Post a Comment

0 Comments