MHT-CET 2021 पावसामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा; पुन्हा देता येणार परीक्षा

राज्यात विविध केंद्रांवर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा MHT-CET सुरू आहे. पावसामुळे मराठवाड्यासह अन्य अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. दरम्यान, मराठवाड्यात पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देता आली नाही त्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाशी ई-मेलने संपर्क साधावा त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांवर MHT-CET परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोहोचता आले नाही. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने विद्यार्थी अडकून पडले. नांदेड विभागातही अनेक विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यात आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी-सीईटीचे परीक्षा सेंटर होते. दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार होते. पण पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरवर पोहोचता आले नव्हते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिलंय की, 'राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.' पावसामुळे ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली आहे, त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EYdZz3
via IFTTT

Post a Comment

0 Comments