Also visit www.atgnews.com
NEET PG २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर, लिंक सक्रिय झाल्यावर 'येथे' तपासा निकाल
Result: नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालाची(NEET PG 2021 Result) लिंक लवकरच अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर सक्रिय करण्यात येणार आहे. रिझल्ट एका मेरिट लिस्टच्या स्वरुपात जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवारांचा रोल नंबर, गुण (८०० पैकी) आणि उमेदवारांनी मिळवलेल्या रँक सारख्या तपशिलांचा उल्लेख आहे. नीट पीजी २०२१ ही परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ मध्ये देशभर २६० हून अधिक शहरांमध्ये आणि ८०० परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. रिजल्टसोबत सर्व कॅटेगरीसाठी क्वालिफाइंग कट-ऑफ जाहीर करण्यात आला आहे. 2021: असा तपासा निकाल स्टेप १: अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता मागितलेली माहिती सबमिट करा. स्टेप ४: तुमचा रिझल्ट स्क्रीनवर येईल. स्टेप ५: रिझल्ट तपासा NEET UG ची उत्तरतालिका होणार जाहीर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)द्वारे लवकरच नीट परीक्षेची उत्तरतालिका (NEET Answer key 2021) जाहीर केली जाणार आहे. नीट २०२१ परीक्षेचे आयोजन १२ सप्टेंबरला केले जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET UG)ची उत्तरतालिका अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाहीर करण्यात येईल. जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका तपासू आणि डाऊनलोड करु शकतात. उमेदवारांना परीक्षेची उत्तरतालिका (NEET Answer Key 2021) डाऊनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉगिन करावे लागणार आहे. उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात येणार आहे. वेबसाइटवर लॉगिन करुन उमेदवार आक्षेप नोंदवू शकतात. उत्तरतालिकेतीस आक्षेपाची नोंद घेऊन नंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे विद्यार्थ्यांचा रिझल्ट तयार करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ukz021
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments