NMPML मध्ये विविध पदांची भरती, ४० हजारपर्यंत मिळेल पगार

NMPML Recruitment 2021: नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, पगार, वयोमर्यादा याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरतीअंतर्गत १४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. कंपनी सचिव (Company Secretary), व्यवस्थापक लेखापाल (Managing Accountant),कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant), व्यवस्थापक (आयटी) Manager (IT), व्यवस्थापक (तांत्रिक) Manager (Technical), व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य) Manager (Technical - Architecture), जनसंपर्क अधिकारी, व्यवस्थापक (Public Relations Officer, Manager) या पदांवर ही भरती केली जाणार आहे. कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) पदाची एक जागा रिक्त असून यासाठी कंपनी सेक्रेटरी (सीएस) किंवा एलएलबी आणि २ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक लेखापाल (Managing Accountant) पदाची एक जागा रिक्त असून यासाठी कॉमर्स/फायनान्स/अकाऊंटींगमध्ये पदवी आणि ५ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant)पदाच्या २ जागा रिक्त असून यासाठी कॉमर्स/फायनान्स/अकाऊंटींगमध्ये पदवी आणि ३ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक (आयटी) Manager (IT) चे एक पद रिक्त असून यासाठी कॉम्प्युटर सायन्स/ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेश इंजिनीअरिंगमध्ये किमान पदवीधर / एमसीए / एमएससी (कॉम्प्युटर सायन्स / आयटी) आणि ०५ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक (तांत्रिक) Manager (Technical) पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी बी. टेक/ बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ उत्पादन) मध्ये इंजिनीअरिंग डिग्री आणि ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य) Manager (Technical - Architecture) पदाची एक जागा रिक्त असून यासाठी आर्किटेक्चर इंजिनीअरिंगमध्ये बी.ई/बी. टेक आणि ५ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer)पदासाठी उमेदवाराकडे कॉर्पोरेट कम्युनिकेशन/मास कम्युनिकेशन्स किंवा पब्लीक रिलेशनमध्ये पदवी आणि ५ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक (Manager)पदाच्या एका जागेसाठी कोणत्याही शाखेत पदवी आणि ०३ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक (Manager)पदाच्या दोन रिक्त जागांसाठी बी.ई. / बी. टेक मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि MS-CIT चे ज्ञान असणे गरजेचे आहे. व्यवस्थापक (Manager) ची एक जागा रिक्त असून यासाठी कोणत्याही शाखेतून पदवी आणि ५ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. या पदभरतीसाठी २१ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत वयोमर्यादा आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. विविध रिक्त पदांसाठी पात्रतेनुसार २५ हजार ते ४० हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. नाशिक (महाराष्ट्र) हे नोकरीचे ठिकाण आहे. उमेदवारांनी https://ift.tt/3F6RCHN या लिंकवर अर्ज करायचा आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली असून याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F0gqB8
via IFTTT

Post a Comment

0 Comments