Also visit www.atgnews.com
जिल्हा तेथे वैद्यकीय कॉलेज असावे यासाठी सरकार प्रयत्नशील: पंतप्रधान मोदी
वृत्तसंस्था, जयपूर देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कॉलेज ( in each district) किंवा पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था असावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे () यांनी गुरुवारी सांगितले. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवांमधील अंतर कमी केले जात आहे. तसेच आयुर्वेद आणि योगाला प्रोत्साहन देण्यावरही सरकार भर देत आहे, असेही ते म्हणाले. राजस्थानमधील चार वैद्यकीय कॉलेजांची पायाभरणी आणि पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटनाच्या आभासी समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. मागील सहा वर्षांत १७०हून अधिक वैद्यकीय कॉलेजे कार्यरत झाली असून, १००हून जास्त नव्या कॉलेजांचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'बाबत (एमसीआय) बोलताना मोदी म्हणाले की, 'पूर्वी 'एमसीआय'च्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात असत आणि पारदर्शकतेवर आरोप होत असत. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि आरोग्यसेवांवर याचा विपरीत परिणाम झाला. अखेर अनेक आव्हानांनंतर 'एमसीआय'च्या जागी 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा'ची (एनएमसी) स्थापना करून सरकार यात सुधारणा करण्यात यशस्वी ठरले. आयोगामुळे झालेला बदल स्पष्ट आहे. आरोग्य क्षेत्रात बदल घडवण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय दृष्टिकोन आणि नव्या राष्ट्रीय धोरणांवर काम केले.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kUOXsy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments