Also visit www.atgnews.com
Vanamati Recruitment 2021: राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत भरती
Vanamati Recruitment 2021: वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. रिक्त जागांचा तपशील कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या नागपूर येथील प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत संचालक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पगार संचालक तथा सहाय्यक प्राध्यापक (अर्थशास्त्र) पदाची (गट अ) एक जागा रिक्त असून यासाठी ७८ हजार ८०० ते २ लाख ९२ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. सहाय्यक प्राध्यापक (कायदा) पदाची (गट अ) एक जागा रिक्त असून यासाठी ६७ हजार ७०० ते २ लाख ८७ हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. सहाय्यक प्राध्यापक (लोकप्रशासन) पदाची (गट अ) अंतर्गत १ जागा रिक्त असून यासाठी ६७ हजार ७०० ते २ लाख ८७ हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. प्रकल्प अधिकारी (गट ब) पदाच्या एका रिक्त जागेसाठी ४१ हजार ८०० ते १ लाख ४२ हजार ३०० रुपये पगार दिला जाईल. प्रकल्प सहाय्यक (अराजपत्रित) (गट ब) ची एक जागा रिक्त असून यासाठी ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८०० रुपये पगार दिला जाईल. लिपिक टंकलेखक (गट क) पदाच्या एका जागेसाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये पगार दिला जाणार आहे. या पदांच्या नियुक्तीचा कालावधी एक वर्षांचा असेल. त्यानंतर आवश्यकता पाहून कालावधी वाढविण्यावर विचार केला जाईल. नोटिफिकेशनसोबत अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर या पत्त्यावर पाठवायचा आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EYuzyH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments