Also visit www.atgnews.com
RRB NTPC परीक्षा शुल्क परत घेण्याची तारीख वाढवली, जाणून घ्या तपशील
Exam 2021 Fee Refund: आरआरबी एनटीपीसी २०२१ परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील विविध झोनच्या रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) द्वारे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरी (एनटीपीसी) परीक्षा २०२१ चे शुल्क परत घेण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. त्यामुळे घेण्यासाठी कोणत्याही कारणामुळे अर्ज न करु शकलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. बोर्डाने १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या अपडेटनुसार ७ सप्टेंबर २०२१ च्या रात्री ११.५९ पर्यंत वाढवण्यात परीक्षा शुल्क परताव्यासाठी अर्ज करता येणार आहे. बोर्डाने सांगितले की, CBT 1 च्या परीक्षेत सहभागी झालेल्या आणि शुल्क परत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील सादर करण्याची ही अखेरची सूचना आहे. परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. आरआरबीची अधिकृत वेबसाइटवर यासाठी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला असून यामाध्यमातून अर्ज करायचा आहे. उमेदवारांना द्यावा लागेल बॅंक डिटेल्स रेल्वे भरती बोर्डाद्वारे जाहीर केलेल्या अपडेटनुसार, जे उमेदवार आरआरबी एनटीपीसी सीबीटी-१ परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना शुल्क परत घेण्यासाठी आपल्या बॅंकेचा तपशिल द्यावा लागेल. नोंदवलेला बॅंक अकाऊंट नंबर, नाव आणि IFSC कोड योग्य आहे का हे लक्षपूर्वक पाहा. एकदा नोंदणी झाल्यानंतर त्यामध्ये बदल होणार नाही. तसेच आरआरबीने दिलेल्या अपडेटनुसार, बॅंक खात्याचा तपशिल ऑनलाइन भरताना काही अडचण आल्यास उमेदवारांच्या सहायतेसाठी अर्ज विंडोवर एक हेल्प विंडोदेखील एक्टीव्ह करण्यात आली आहे. परीक्षा शुल्क मिळेल परत रेल्वे भरती बोर्डाने वर्ष २०१९ च्या सुरुवातीला ग्रुप सी ची ३५ हजार २७७ पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले. या पदांसाठी अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांची कॉम्प्युटर आधारित परीक्षा सात टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. सातवा टप्पा ३१ जुलै २०२१ ला संपला. अर्ज करताना उमेदवारांनी ५०० रुपये शुल्क भरले होते. आरआरबीतर्फे पहिल्या टप्प्यातील परीक्षेनंतर ४०० रुपये परत दिले जात आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38v4uZm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments