Also visit www.atgnews.com
IBPS CRP RRBs X officer scale I prelims scores: आयबीपीएस परीक्षेचा निकाल जाहीर
IBPS CRP RRBs X officer scale I prelims score: इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने सीआरपी-आरआरबी-एक्स ऑफिसर स्केल I पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी आयबीपीएस सीआरपी-आरआरबी-एक्स ऑफिसर स्केल I प्रारंभिक परीक्षा दिली, ते आपला निकाल आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर येथे पाहू शकतात. आयबीपीएस आरआरबी प्रीलिम्स परीक्षा १ ऑगस्ट ७ ऑगस्टपर्यंत पर्यंत आयोजित करण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे, ते आता २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेत सहभागी होऊ शकतात. आयबीपीएसने आयबीपीएस आरआरबी स्केल I परीक्षेसाठी रिक्त जागांची संख्याही वाढवली आहे. आधी ४,२५७ जागांसाठी ही भरती होणार होती, मात्र आता ही संख्या वाढवून ४,७१६ करण्यात आली आहे. आयबीपीएस सीआरपी-आरआरबी-एक्स ग्रुप ए - ऑफिसर स्केल- I पूर्व परीक्षा १,७,८,१४ आणि २१ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. ऑफिसर स्केल I आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देश्यीय) पदांसाठी परीक्षा दोन टप्प्यात म्हणजेच पूर्व आणि मुख्य अशी ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. IBPS RRB Officer Scale-I prelims result: निकाल पुढील पद्धतीने तपासा स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibps.in. वर जा. स्टेप २- ‘view ibps rrb officer scale-I result' लिंक वर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४- स्कोर आता तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी हा निकाल डाऊनलोड करून ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ytpQAI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments