Also visit www.atgnews.com
UPSC Result: अमेरिकेची नोकरी सोडून विनायक नरवडे बनला अधिकारी
Result : यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये अहमदनगरचा देशात ३७वा आला आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी विनायकला आपल्या अमेरिकेतील नोकरीवर पाणी सोडावे लागले. पण परीक्षा उत्तीर्ण होणार हा विश्वास त्याला होता. देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे अमेरिकेतील नोकरी सोडून त्याने यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले आणि देशातून ३७ वा येण्याचा मान पटकावला. मुळचा नगरचा असणाऱ्या सीओईपीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनतर विनायकने कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, काही काळ आयटी कंपनीत नोकरी केली. त्याचवेळी त्याला सनदी अधिकारी होउन, देशसेवा करण्याची इच्छा झाली. त्याने वेळ वाया न घालवता २०१८ मध्ये अभ्यासाला सुरुवात केली. दिवसाला साधारण १२ ते १३ तास अभ्यास केल्यामुळे, दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवता आले. सकारात्मक विचार करीत, मनलावून स्व अभ्यास केल्यास यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे, असे अमेरिकेतील नोकरी सोडून परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विनायक नरवडे याने सांगितले. या परीक्षेमध्ये बिहारचा आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातील नागपूरची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. २०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयोगाने ८३६ जागांसाठी झोतलेल्या या परीक्षेतून ७६१ पात्र उमेदवार मिळाले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CO5fJM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments