Also visit www.atgnews.com
Army TES 46: भारतीय सैन्यात टेक्निकल एंट्री स्किमसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात
Army TES 46: भारतीय सैन्यामध्ये हायर सेकेंडरीनंतर टेक्निकलनंतर टेक्निकल कोअरमध्ये एंट्री स्किम १०+२ अंतर्गत टीईएस-४६ कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे टीईए-४६ कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून सुरु होणार होती. दुसरीकडे १०+२ टेक्निकल एंट्री स्किम ४६ भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होण्यासोबतच याचे नोटिफिकेशन देखील भारतीय सैन्याद्वारे जाहीर करण्यात आले आहे. असा करा अर्ज भारतीय सैन्यातमध्ये बारावीनंतर टेक्निकल कोरमध्ये भरतीसाठी आर्मी टेक्निकल एंट्री स्किम हा पर्याय आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना भारतीय सैन्याचे भरती पोर्टल joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या ऑफिसर्स एंट्री अर्ज/लॉगिनच्या लिंकवर क्लिक करा. नव्या पेजवर उमेदवारांनी आधी नोंदणीच्या लिंकवर क्लिक करुन दिलेले निर्देश वाचा. यानंतर मागितलेली माहिती भरुन सबमिटवर क्लिक करा. यानंतर आपला युजरनेम आणि रजिस्टर पासवर्डच्या मदतीने लॉगिन करुन संबंधित भरतीसाठी अर्ज सबमिट करा. अर्जासाठी पात्रता भारतीय सैन्यातर्फे टीईएस-४६ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जेइइ मेन २०२१ परीक्षेत किमान गुण असणे गरजेचे आहे. किमान गुणांची सविस्तर माहिती नोटिफिकेशन देण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांमध्ये किमान ६० टक्के गुणांनी पास असणे गरजेचे आहे. एसएससी टेक्निकल आणि जेएजी एंट्री भरती भारतीय लष्कराने ()एक अधिसूचना जारी करून SSC (तांत्रिक) ५८ व्या कोर्ससाठी पुरुष आणि २९ व्या कोर्ससाठी महिला प्रवेशासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २८ सप्टेंबर २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, joinindianarmy.nic.in ला भेट देणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२१ आहे. या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केली जाईल. रिक्त पदांची संख्या, परीक्षेची तारीख आणि इतर तपशील भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचनेद्वारे उपलब्ध होतील. उमेदवारांनी पुढील अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. याव्यतिरिक्त, भारतीय लष्कराने कायदा पदवीधर पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी जेएजी भरती २८ व्या कोर्ससाठी (एप्रिल २०२२ मध्ये नियोजित) एक छोटी सूचना देखील जारी केली आहे. अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार २९ सप्टेंबर २०२१ पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२१ आहे. या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना देखील वेळेत जारी केली जाईल. जेएजी २०२१ कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशील जसे की वयोमर्यादा, अनुभव आणि निवड प्रक्रिया, पगार आणि अर्ज प्रक्रियेचा तपशील अधिसूचना जारी झाल्यानंतर उपलब्ध होईल. सविस्तर अधिसूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ajK0U9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments