UGC NET २०२१ 'या' परीक्षांच्या तारखांसोबत होतेय क्लॅश, उमेदवार संभ्रमात

UGC NET 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे १७ ऑक्टोबर २०२१ पासून होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. एजन्सीने जून २०२१ आणि डिसेंबर २०२० एडिशनच्या यूजीसी नेटच्या संयुक्त परीक्षा १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधी ही परीक्षा ६ ऑक्टोबर रोजी होणार होती. आता परीक्षेला १० दिवस शिल्लक असताना एनटीएकडून अद्याप प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले नाही. या परीक्षेला बसलेले उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षणमंत्री आणि एनटीएच्या डायरेक्टर जनरल यांच्याकडे प्रवेश पत्र जाहीर करण्याची मागणी करीत आहेत. यूजीसी नेट २०२१ द्वारे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर अॅक्टिव्ह केली जाईल. उमेदवार आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतील. दुसरीकडे देशभरातील विविध राज्यांमधील अनेक विद्यार्थ्यांमध्ये यूजीसी नेट परीक्षेच्या बाबतीत संभ्रमाचे वातावरण आहे. यूजीसी नेट परीक्षेची १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर ही तारीख प्रस्तावित परीक्षांसोबत क्लॅश होत आहे. त्यामुळे कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती देऊ नये? हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाहीय. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश लोकसेवा (UPPSC) यूपी पीएस प्रारंभिक परीक्षा २०२१ ही २४ ऑक्टोबरला होणार हे आधीच जाहीर करण्यात आले होते. यूजीसी नेट परिक्षा २०२१ च्या अंतर्गत २४ अक्टोबर रोजी पेपर आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना UPPCS प्रिलिम्स २०२१ सोडावी लागणार आहे. याचप्रमाणे राजस्थानमध्ये ५३७८ पटवारी पदांवर भरती परीक्षेचे आयोजन राजस्थान कर्मचारी निवड बोर्ड (RSMSSB), जयपूर द्वारे २३ आणि २४ अक्टोबरला केले जाणार आहे. यूजीसी नेट परीक्षा पॅटर्न यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो आणि परीक्षा एकूण तीन तासांची असते. परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्कींग नसते. यासोबतच दोन्ही पेपरमध्ये १५० प्रश्न असतात. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फलोशिप पदासाठी अर्ज करता येतो. उमेदवार पीचएडीसाठी देखील प्रवेश घेऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aqEX49
via IFTTT

Post a Comment

0 Comments