पुण्यातील विद्यापीठ-कॉलेजांची 'ऑफलाइन'ची तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे उपमुख्यमंत्री यांनी सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील कॉलेज, विद्यापीठे सुरू करण्याच्या घोषणेचे सावित्रीबाई फुले आणि कॉलेजांनी स्वागत केले असून, सुरक्षित नियमांचे पालन करून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्राचार्यांनी दिली. विद्यापीठातर्फे कॉलेजांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी, तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी १८ वर्षांवरील असून, अनेकांचे लशीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीतही कॉलेज ऑफलाइन शिक्षणासाठी बंद ठेवल्याने, राज्य सरकारच्या धोरणावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर अजित पवार यांनी सोमवार ११ ऑक्टोबरपासून कॉलेज, विद्यापीठे सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीएचडी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठे आणि कॉलेज सुरू करणे गरजेचे होते. त्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तयारी करण्यात येत होती. आता विद्यापीठे व कॉलेज सुरू करण्याची अधिकृत घोषणा झाल्यामुळे, संलग्न कॉलेजांना आवश्यक सूचना करण्यात येईल, असे डॉ. उमराणी यांनी सांगितले. शाळा आणि ज्युनिअर कॉलेज काही दिवसांपूर्वी सुरू केल्यामुळे, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे कॉलेज सुरू करण्याची शैक्षणिक संस्थांची पूर्ण तयारी आहे. प्राध्यापक-शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, लशीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. शैक्षणिक संकुलात नियमित सॅनिटायझेशन होत असून, स्वच्छतागृहांमध्ये साबण आणि पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन आणि यंत्रणा आहे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांनी लशीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या 'आरटी-पीसीआर' चाचणीचा रिपोर्ट तपासण्यात येईल, असे प्राचार्यांनी सांगितले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कॉलेज सुरू होण्याची आवश्यकता होती. अनेक प्राचार्यांनी बैठकीतदेखील याबाबत मागणी केली होती. सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाप्रमाणे संलग्न कॉलेजांना येत्या एक ते दोन दिवसांत आवश्यक सूचना देण्यात येतील. कॉलेज सुरू होणे ही प्राध्यापक, प्राचार्यांसाठी दिवाळीपूर्वीची दिवाळी आहे, असेच म्हणायला हवे. - डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पणे विद्यापीठ कॉलेज सुरू करण्याचा निर्णय अतिशय चांगला असून, त्याची आवश्यकता होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित नियमांचे पालन करून, पदवी आणि पदव्युत्तरचे वर्ग सुरू करण्यात येतील. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. त्यासाठी 'ऑफलाइन'सोबत ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येईल. - डॉ. सविता दातार, प्राचार्य, एस. पी. कॉलेज कॉलेज सुरू करताना, विद्यार्थ्यांची अचानक गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमानुसार टप्प्याटप्प्याने कॉलेज सुरू करायला हवीत. सुरुवातीला पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या आणि पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलवण्यात येईल. या काळात विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके सुरू राहतील, याकडे लक्ष देण्यात येईल. - डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्‌‌स, सायन्स अँड कॉमर्स


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ajTX3N
via IFTTT

Post a Comment

0 Comments