ISRO Recruitment 2021: इस्त्रोमध्ये भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

I SRO Recruitment 2021: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इस्रोने कनिष्ठ संशोधन फेलो () पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या अंतर्गत एकूण १६ पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट iirs.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. इस्रोने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनननुसार प्रत्येक पोस्टसाठी एक विशिष्ट पोस्ट कोड निर्धारित करण्यात आला आहे. तसेच मुलाखतीच्या तारखा पोस्ट कोडनुसार दिल्या जात आहेत. जेआरएफ कोड ६६,६८,७०, ७१ साठी उमेदवारांची मुलाखत २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता होईल. जेआरएफ कोड ६६ असलेल्या उमेदवारांची मुलाखत २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घेण्यात येईल. दुसरीकडे जेआरएफ ६९ आणि ७४ कोडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २७ ऑक्टोबर रोजी परीक्षेला हजर राहावे लागेल. या व्यतिरिक्त, इतर कोडसाठी मुलाखतीच्या तारखा उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशनवर पाहता येणार आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा नोटिफिकेशनमध्ये जाहीर करण्यात आली आहे. मुलाखतीचे ठिकाण JRF च्या कोडनुसार थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना IIRS सिक्युरिटी रिसेप्शन, IIRSISRO/DOS, ४ कालिदास रोड, देहरादून-२४८००१ या पत्त्यावर येणे गरजेचे आहे. मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. इस्त्रोतर्फे स्पेस चॅलेंज भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या सहकार्याने नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने देशातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 'स्पेस चॅलेंज' आणले आहे. हे आव्हान देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये ATL (अटल टिंकरिंग लॅब) प्रयोगशाळा असलेल्या शाळा देखील ATL नसलेल्या शाळांशी संबंधित आहेत. अधिकृत निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) ने देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज सादर केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले व्यासपीठ प्रदान करण्यात आले आहे. जिथे विद्यार्थी नवकल्पना सादर करू शकतात आणि स्वतः डिजिटल युगाच्या अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या सोडवू शकतात. एटीएल स्पेस चॅलेंज २०२१ हे जागतिक अंतराळ सप्ताह २०२१ सोबत जोडण्यात आले आहे. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची आठवण म्हणून हा सप्ताह दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान जागतिक पातळीवर साजरा केला जातो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ajGXeC
via IFTTT

Post a Comment

0 Comments