Also visit www.atgnews.com
एमएएच एमबीएसीईटी परीक्षेचा निकाल आणखी रखडणार? सुनावणी १३ डिसेंबरला
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (Maharashtra ) घेण्यात येणाऱ्या एमएएच एमबीएसीईटी परीक्षेचा निकाल (MAH )जाहीर होण्यास आणखी विलंब होण्याची अपेक्षा आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील पुढील सुनावणी आता १३ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. ताज्या अपडेटनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय याचिकाकर्त्यांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी एमबीए सीईटी 2021 निकाल जाहीर करण्यासाठी स्वतंत्र आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार cetcell.mahacet.org वर अधिक वेळेवर माहिती मिळवू शकतात . ही परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यापूर्वी २८ सप्टेंबर २०२१ रोजी एमएएच सीईटी एमबीए निकाल २०२१ जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, विद्यार्थ्यांच्या एका गटाने दाखल केलेल्या याचिकेमुळे त्यास विलंब झाला. या याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी या निकालाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. पहिली सुनावणी २६ ऑक्टोबरला झाली आणि पुढची सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे. याचिकाकर्त्याने त्यांच्या जनहित याचिकेत दावा केला होता की त्यांना सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या एमबीए सीईटी परीक्षेत चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी, एमएएच सीईटी एमबीए निकाल २०२१ सोशल मीडियावर फिरत असल्याच्या अफवा होत्या. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शरद पवार आणि विविध संबंधितांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर लगेचच हा प्रकार घडला. त्याचवेळी इंटरनेटवर 'admitcardbuilder' नावाची अनधिकृत लिंक फिरत होती. जे उमेदवार किमान कट ऑफ गुण मिळवून पात्र ठरतील त्यांना DTE, महाराष्ट्र द्वारे आयोजित केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) बोलावले जाईल. परीक्षेत मिळालेली रँक, दिलेले कॉलेज प्राधान्य आणि जागांची उपलब्धता यानुसार जागा वाटप केल्या जातील. डीटीई याचिकाकर्त्यांव्यतिरिक्त इतर इच्छुकांसाठी निकाल जाहीर करेल. MAH CET MBA निकाल 2021 वर अधिक अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pOQSSy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments