Also visit www.atgnews.com
दिल्लीच्या शाळांमध्ये होणार पालक संवाद कार्यक्रम
Delhi School: दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांशी नियमितपणे संपर्क साधला जाणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी '' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 'पालक संवाद: चला पालकांशी बोलूया' असे या कार्यक्रमाचे नाव असून या कार्यक्रमांतर्गत १८ लाखांहून अधिक पालकांशी थेट संपर्क साधला जाईल असे सिसोदिया यांनी यावेळी सांगितले. त्यागराज स्टेडियममध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वसाधारणपणे पालकांद्वारे दोन प्रकारची काळजी घेतली जाते. एकतर विद्यार्थ्यांची अजिबात काळजी घेतली जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्तच काळजी घेतली जाते. हे दोन्ही प्रकार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हानिकारक आहेत असे मनिष सिसोदिया म्हणाले. पालक एकतर मुलांचे बॉस बनतात आणि त्यांना सूचना देतात किंवा पालकांची नवीन पिढी मुलांना मित्र बनविण्याचा प्रयत्न करते. पण मुलांना फक्त पालक हवे असतात. बॉस किंवा मित्र नको असतात. त्यांच्या आयुष्यात ही भूमिका साकारण्यासाठी वेगवेगळे लोक असतात असेही ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान १८ लाखांहून अधिक पालकांशी संपर्क साधला जाणार आहे. 'शाळा मित्र' म्हणून काम करण्यासाठी दिल्ली सरकार स्वयंसेवक आणि पालकांकडून सहकार्य घेणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्यात संवाद साधून हे अंतर कमी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय राजधानीतील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. कोणत्याही मुलांना शाळेत येण्यास भाग पाडले जाणार नाही. अभ्यास ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून चालेल याची काळजी घेतली जाईल असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 'दिल्लीतील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था १ नोव्हेंबरपासून सर्व वर्गांसाठी उघडण्यास परवानगी दिली जाईल. जे विद्यार्थी ऑफलाइन वर्गांना उपस्थित राहण्यास इच्छुक नाहीत त्यांच्यासाठी शाळा ऑनलाइन वर्ग सुरू ठेवली जाईल असे मनीष सिसोदिया यांनी एका ट्विटमध्ये म्हटले. कोणत्याही पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती करू नये, असे तज्ञांनी सुचवले आहे. सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेचे वर्ग हायब्रिड पद्धतीने भरवले जातील याची खात्री करावी लागेल असे सिसोदिया म्हणाले. करोना साथीमुळे मार्च २०२० पासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्या पुन्हा बंद करण्यात आल्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZuhywE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments