Also visit www.atgnews.com
एसएनडीटी विद्यापीठाच्या १६ अभ्यासक्रमांना मान्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ अनुदान आयोगाने () महिला विद्यापीठाच्या () 'दूरस्थ शिक्षण केंद्रात' आणखी सोळा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये बीए, बीकॉम, एमए, आणि एमकॉम या अभ्यासक्रमांचा समावेश असून, बीए आणि एमए पदवीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या सात विषयांचा अंतर्भाव आहे. केंद्रामार्फत चालवल्या जाणाऱ्या एकूण १६ अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२पासून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळवण्यात केंद्राच्या संचालिका माजी प्राचार्य डॉ. स्मृती भोसले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. केवळ सहा महिन्यांच्या आपल्या कारकिर्दीत यूजीसीच्या सर्व नियमांची पूर्तता अधिकृतपणे करण्यात आणि विद्यापीठाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांनी यश मिळवले आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने एक गौरवास्पद बाब आहे. आयोगाच्या नव्या नियमांनुसार २०२१-२२ चे हे शैक्षणिक वर्ष सुधारित स्वरूपात नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची असून, प्रवेशप्रक्रियेविषयीची तसेच अभ्यासक्रमाविषयीची अधिकची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना स्वयं-अध्ययन साहित्य छापील तसेच ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असून, परीक्षा केंद्रे राज्यभरात उपलब्ध असतील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XVqPxr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments