Also visit www.atgnews.com
CET Result 2021: एलएलबीसह सहा सीईटींचे निकाल जाहीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या आठपैकी सहा परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी बीपीएड आणि एलएलबी पाचवर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीपीएड प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून सहा हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार ४८० विद्यार्थी ८ ऑक्टोबरच्या ऑनलाइन परीक्षेला बसले होते. तर मैदानी चाचणी परीक्षा ९ ते १४ ऑक्टोबरला घेण्यात आली होती. या परीक्षेला पाच हजार ४२५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी जाहीर झालेल्या निकालात हे सर्व विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचाही निकालही गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. या सीईटीला राज्यभरातून २४ हजार ८८२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ हजार ६६ विद्यार्थी बसले होते. यापैकी १६ हजार ६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एमपीएड सीईटीच्या परीक्षेला एक हजार ६४५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक हजार ६४० विद्यार्थी पात्र झाले आहेत. बीए, बीएस्सी बीएड या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या परीक्षा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला १,३३३ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. बीएड आणि एमएड तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या परीक्षेला एक हजार ५०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७२८ विद्यार्थी बसलेल होते. सर्व विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरले आहेत. निकाल संकेतस्थळावर उपलब्ध या सर्व अभ्यासक्रमांचा निकाल सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. आता कॉलेजांकडून जागांची नोंदणी केली जात असल्याचे प्रवेश परीक्षा कक्षाने सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ClCp3P
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments