नीट यूजी निकालासंदर्भात महत्वाची अपडेट

NEET UG 2021: राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या (NEET UG 2021) निकालाची कधीही घोषणा केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट यूजीचा निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. एनटीएला सर्वोच्च न्यायालयाने दोन उमेदवारांचे निकाल रोखण्याऐवजी उर्वरित १६ लाख उमेदवारांचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. 2021: असा पाहा निकाल सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या. निकालाच्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा आणि सबमिट करा. तुमच्या स्क्रीनवर रिझल्ट दिसेल. तो डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या निकालास उशीर नीट यूजी परीक्षेदरम्यान वैष्णवी भोपाली आणि अभिषेक शिवाजी या दोन वैद्यकीय उमेदवारांच्या चाचणी पुस्तिका आणि OMR शीट्स परीक्षा केंद्रात मिक्स झाल्या होत्या. दोन्ही विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी होत होती. तर दुसरीकडे लाखो उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या दोन विद्यार्थ्यांना नीटचा निकाल २०२१ जाहीर करण्यापूर्वी परीक्षा देण्यास सांगितले. जर एनटीएने या दोन विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली तर १६ लाख उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे त्यांच्या पुढील प्रवेशातही अडचणी येऊ शकतात. नीट निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले. त्याचवेळी दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. ज्या दोन विद्यार्थ्यांमुळे हा निकाल रोखण्यात आला होता, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येईल असे एनटीएने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बी. आर. गवई यांनी ही विशेष नोटीस जाहीर केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या २० ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पीटीशनच्या माध्यमातून आव्हान दिले होते. चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्यामुळे महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याशिवाय एनटीएला नीट २०२१ चा निकाल जाहीर करता येत नसल्याने निकालाला विलंब झाला होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mohYxy
via IFTTT

Post a Comment

0 Comments