ससून रुग्णालयात विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

Recruitment 2021: पुण्यातील बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती होत आहे. संस्थेकडून यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय अंतर्गत पदभरतीमध्ये वविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), स्टाफ नर्स (Staff Nurse), प्रकल्प समन्वयक (Project Coordinator) आणि सहाय्यक नर्सिंग समन्वयक (Assistant nursing Coordinator) पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार देखील वेगळा असणार आहे. या सर्व उमेदवारांना नवजात कक्षात काम करण्याचा अनुभव असल्यास पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. पगार वैद्यकीय अधिकारी पदासाठी ४० हजार, स्टाफ नर्स पदासाठी १ लाख २० हजार, प्रकल्प समन्वयक पदासाठी २५ हजार आणि सहाय्यक नर्सिंग समन्वयक पदासाठी १५ हजार पगार देण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मुलाखत ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सामान्य रुग्णालये,पुणे या पत्त्यावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. दुपारी २ ते ६ या वेळेत मुलाखत होणार आहे. उमेगवारांना स्वत:च्या खर्चाने उपस्थित राहावे लागेल. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत भरती राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहयोगी (Project Associate) आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी ( Senior Project Associate) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fj9AGX
via IFTTT

Post a Comment

0 Comments