आव्हान जीमॅट परीक्षेचं!

सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य व समुपदेशक जीमॅट परीक्षा (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, ) व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी भारतातच नव्हे तर जगात कोणत्याही विद्यापीठात आणि परदेशातील एमएस अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेचं संपूर्ण आयोजन आणि संचलन जीमॅक (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अकॅडमिक कौन्सिल) यांच्या वतीनं घेण्यात येते. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११४ देशांतील २१०० विद्यापीठात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ६००० विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची तर्कधिष्टीत आणि समीक्षात्मक विचार करण्याचं कौशल्य इत्यादींवर आधारित प्रश्न असतात. तसंच विविध समस्यांच्या आधारे विद्यार्थी एखाद्या माहितीचं किती चांगलं विश्लेषण आणि मूल्यांकन करू शकतात याचीही चाचपणी केली जाते. जीमॅट परीक्षेची काही वैशिष्ट्यं परीक्षेचं स्वरूप: परीक्षेतील एकूण चार विभाग पूर्ण करायचे असतात. त्यापैकी तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम ठरवायचा असतो. - क्वांटिटेटिव्ह रीजनिंग: यामध्ये साधारण ३१ प्रश्न आणि अपेक्षित कालावधी ६२ मिनिटं - व्हर्बल रीजनिंग: यामध्ये तुमचं इंग्रजी लेखनातील प्रभुत्व, विश्लेषण कौशल्य व युक्तिवाद आणि समीक्षणात्मक वाचन क्षमता इत्यादींवर आधारित साधारण ३६ प्रश्न असतात. अपेक्षित कालावधी ६५ मिनिटं. - इंटिग्रेटेड रीजनिंग: यामध्ये साधारण १२ प्रश्न असतात आणि एकूण कालावधीत ३० मिनिटं - अॅनॅलटीकल रायटिंग यामध्ये निबंध वजा १ प्रश्न विचारण्यात येतो. अपेक्षित कालावधी ३० मिनिटं. परीक्षेमध्ये ८ मिनिटांची ऐच्छिक विश्रांतीसुद्धा घेता येते. परीक्षेचं आयोजन वर्षभर करण्यात येतं. प्रति १६ दिवसांनी आपण या परीक्षेस प्रविष्ट होऊ शकता. १२ महिन्यांमध्ये आपण पाच वेळा ही परीक्षा देऊ शकता आणि जास्तीत जास्त आठ वेळा. तुमच्या मागणीनुसार भारतातील एकूण ३९ परीक्षा केंद्रांवर आणि ३४ मुख्य शहरांमध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. परीक्षेस प्रविष्ट झाल्यानंतर तुम्ही तुमचा अधिकृत स्कोर रिपोर्ट २० दिवसांनी जीमॅकच्या वेबसाइटवर पाहू शकता. अपेक्षित स्कोअर रेंज- २०० ते ८०० स्कोअर वैधता- ५ वर्षं परीक्षा कालावधी- साधारण तीन तास २३ मिनिटं स्कोरिंग रिपोर्ट: तुमच्या अधिकृत स्कोर रिपोर्टमध्ये एकूण स्कोरमध्ये सेक्शन निहाय स्कोर आणि पर्सेंटाइल रँक इत्यादी स्पष्टपणे नमूद केलेलं असेल. परीक्षा झाल्याबरोबरसुद्धा तुम्हाला तुमचा स्कोर पाहता येतो. पण तो स्कोर अधिकृत धरला जात नाही. परीक्षेसाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करताना पुढील काही टप्पे लक्षात ठेवा - अधिकृत जीमॅट पोर्टलवर नोंदणी करा. - वैयक्तिक माहिती भरा. - वैयक्तिक माहिती भरल्यानंतर ती जमा करा. - परीक्षेचं केंद्र, दिनांक आणि वेळ इत्यादीची निवड करा. - परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होते. परीक्षा नोंदणी, परीक्षेचं वेळापत्रक, परीक्षा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होण्यासाठी, परीक्षा शुल्क, परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी एकूण प्रयत्न, प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होऊन देण्याच्या परीक्षेविषयीची माहिती किंवा ऑनलाइन परीक्षा विषयीची माहिती, परीक्षेतील प्राप्त गुण/प्रावीण्य, प्राप्त केलेल्या गुणांची वैधता इत्यादी सविस्तर माहिती www.mba.com/gmat किंवा www.mba.com/gmatonline या संकेतस्थळांवरुन घ्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3a9CevU
via IFTTT

Post a Comment

0 Comments