मुंबईतल्या आयकर भवनमध्ये विविध पदांची भरती

IT Department Recruitment 2021: आयकर अपीलीय न्यायाधिकरण ( Appellate Tribunal Recruitment) मुंबई यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरण पदभरतीअंतर्गत वरिष्ठ खासगी सचिव पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवाराला १२० शब्द पर मिनिट या स्पीडने टायपिंग येणे गरजेचे पदासाठी ४५ हजार ते १ लाख ५० हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे. पदाचा कालावधी ३ वर्षाचा असणार आहे. त्यानंतर हा कालावधी २ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज भरुन पाठवायचा आहे. त्यापुर्वी अर्ज काळजीपुर्वक वाचावा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास तो बाद करण्यात येईल. उमेदवारांनी आपला अर्ज सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई, पिनकोड- ४०००२० या प्त्त्यावर पाठवायचा आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. आयकर विभागातर्फे असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) आणि स्टेनोग्राफर ग्रेड -२ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ५ ऑक्टोबरला आयकर विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, तीनही पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र असलेल्या गुणवान खेळाडूंकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर incometaxindia.gov.in जा. त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या 'व्हॉट्स न्यू' सेक्शनमध्ये संबंधित जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. या लिंकवरुन उमेदवार आयकर विभाग, दिल्ली भरती २०२१ ची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्ज करण्यासाठी नमुना फॉर्म जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. हा फॉर्म पूर्ण भरुन, मागितलेली कागदपत्रे सोबत जोडावी. उमेदवारांनी आपला अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत आयकर उपायुक्त (हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर -३७८ ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली - ११०००२१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YyrPYr
via IFTTT

Post a Comment

0 Comments