Also visit www.atgnews.com
CRPF मध्ये मुलाखतीच्या आधारे होणार निवड, ८५ हजारपर्यंत मिळेल पगार
CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदभरतीतून आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) ची पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. उमेदवारांना सीआरपीएफची अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर नोटिफिकेशन पाहता येणार आहे. उमेदवारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाणार आहे. हा कालावधी आणखी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. रिक्त जागा या प्रक्रियेद्वारे एकूण ६० रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामध्ये स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसरच्या २९ आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या ३१ जागा भरल्या जाणार आहेत. पगार स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना ८५ हजार रुपयांपर्यंत तर जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ७५ हजार रुपये पगार मिळेल. शैक्षणिक पात्रता स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पदवी/डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही असणे आवश्यक आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदाच्या भरतीसाठी उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी आणि इंटर्नशिप पूर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे. मुलाखतीचा तपशील वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासह नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे लागेल. ही मुलाखत २२ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. मुलाखतीनंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. अधिकृत वेबसाइट http://www.crpf.gov.in वर यासंदर्भात अधिक माहिती देणयात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Zu9SdG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments