Also visit www.atgnews.com
icsi cs june 2021 परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (Institute of Company Secretaries of India,ICSI) कंपनी सेक्रेटरीज फाउंडेशन, प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम परीक्षा २०२१ च्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार या परीक्षांना बसणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट वरून आपला निकाल पाहू शकतील. वेळापत्रकानुसार, प्रोफेशनल प्रोग्रामचा निकाल १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या निकाल १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे. फाउंडेशन प्रोग्रामचा निकाल १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. निकाल कशा पद्धतीने पाहायचा, जाणून घ्या... - .edu या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. - लिंकवर क्लिक करा - क्रिडेन्शिअल्सच्या मदतीने लॉग इन करा - आता निकाल स्क्रीनवर दिसेल. - उमेदवारांनी निकाल डाऊनलोड करावा. उमेदवारांनी त्यांचा ई-रिझल्ट डाऊनलोड करावा, कारण प्रत्यक्ष मार्कशीट पाठवली जाणार नाही. मात्र प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाईल. आयसीएसआयने सांगितल्यानुसार, निकाल लागल्यानंतर उमेदवारांना निकाल आणि गुणपत्रिका फिजिकली पाठवण्यात येईल. एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या कार्यक्रमांच्या पुढील परीक्षा २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना १९६८ मध्ये झाली आहे. भारतातील कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनचा विकास, नियमन, प्रमोशन आदी बाबींची जबाबदारी ही संस्था पार पाडते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YKo9TJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments