JEE Main पेपर २ चा निकाल जाहीर, 'या' लिंकवरुन पाहा स्कोअर कार्ड

Result 2021: राष्ट्रीय चाचणी एजन्सी () तर्फे इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (Main) म्हणजेच JEE (Main) २०२१ च्या पेपर २ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. एजन्सीने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी उशिरा कोर्सेसच्या प्रवेश परीक्षेलत सहभागी झालेल्या उमेदवारांना स्कोअर कार्ड पाहण्यासाठी लिंक अॅक्टीव्ह केली. जेईई मेन पेपर २ परीक्षा २०२१ मध्ये सहभागी झालेले उमेदवार आपले स्कोअर कार्ड एनटीए परीक्षा पोर्टल neeresults.nic.in वर अॅक्टीव्ह करण्यात आलेल्या लिंकद्वारे पाहू शकतात. ntaresults.nic.in वर दिल्या गेलेल्या लिंकवरुन देखील निकाल पाहता येईल. बातमीखाली याची थेट लिंक देणयात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे देशभरातील शासकीय आणि खासगी इंजिनीअरिंग संस्थांमधील बॅचलर ऑफ आर्किटेक्चरल आणि बॅचलर ऑफ प्लॅनिंग अभ्यासक्रमांमध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. पहिल्या सत्राचे आयोजन २३ फेब्रुवारी आणि सत्र ४ चे आयोजन २ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर करण्यात आले होते. परीक्षा झाल्यानंतर तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. यावर आक्षेप नोंदविण्यासाठी उमेदवारांना २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला. उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची नोंद घेऊन ५ ऑक्टोबर रोजी निकालाची घोषणा करण्यात आली. या उमेदवारांना १०० टक्के गुण एनटीएने जेईई मेन पेपर २ रिझल्टची घोषणा करण्यासोबतच पेपर २ ए आणि २ बीमध्ये १०० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि राज्यानुसार टॉपर्सची यादी देखील जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी पेपर २ मध्ये १०० टक्के गुण मिळविले त्यांची नावे पुढे देण्यात आली आहेत. या नावामध्ये महाराष्ट्रातील आदित्य जाधव याचा समावेश आहे. B.Arch (पेपर २ए) - बी. अनंत कृष्णन (तामिळनाडू), नोआ सॅम्युअल (जम्मू आणि काश्मीर), जोसुला वेंकट आदित्य (तेलंगणा) B.Arch (Paper २बी) - आदित्य सुनील जाधव (महाराष्ट्र) आणि ईश्वर बी. बालप्पनवर (कर्नाटक)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lehQ35
via IFTTT

Post a Comment

0 Comments